इतर समाजातील स्त्रियांचे अॅपद्वारे लिलाव करणारे तरुण-तरुणी देशाचं भवितव्य तर सोडाच, पण घरातल्या स्त्रियांचा तरी सन्मान करू शकतील?
भारताच्या संविधानाधारे आणि लोकशाही प्रक्रियेतून सत्तेत गेलेले लोकप्रतिनिधी जाहीरपणे आणि उद्दामपणे ‘देश के गद्दारोंको गोली मारो’ अशा स्त्रियांना अपमानकारक असलेल्या आणि कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या घोषणा देतात. या देशात द्वेषपूर्ण विचार डोक्यात पेरलेले तरुण-तरुणी ‘सुली डील’, ‘बुल्ली बाई’सारख्या माध्यमातून एखाद्या समाजाच्या स्त्रियांचा लिलाव करतात, ही भारताची संस्कृती आहे का?.......